Zomato चे शाकाहारी ग्राहकांसाठी ओन्ली ‘Pure Veg Mode ऑन!’
Zomatoचे सीईओ दीपंदर गोयल यांनी 19 मार्च 2024 रोजी 100 टक्के शाकाहारी असलेल्या ग्राहकांसाठी झोमॅटोवर ‘प्युअर व्हेज फ्लीट’ सोबत ‘Pure Veg Mode’ लाँच केला. नव्याने लॉन्च झालेल्या प्युअर व्हेज प्लेट द्वारे फक्त शुद्ध शाकाहारी जेवण वितरित केले जाणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा ड्रेस कोड हा लाल नसून हिरव्या रंगाचा टी-शर्ट असणार आहे सोबतच हिरव्या रंगाची डिलिव्हरी बॅग पण असणार आहे.
पुढील काही आठवड्यांमध्ये देशभरात टप्प्याटप्प्याने ही ऑफर आणली जाणार आहे. गोयल यांनी स्वतःचा आणि झोमॅटो फूड डिलिव्हरी सीईओ राकेश रंजन यांचा झोमॅटोच्या नव्याने लाँच केलेल्या फ्लीटच्या डिलिव्हरी बॉय नी परिधान केलेले हिरवे टी शर्ट घातलेले फोटो देखील शेअर केले. लॉन्चच्या पहिल्या दिवशी काही ऑर्डर देण्यासाठी ते स्वतः बाहेर पडले.
प्युअर व्हेज फ्लीट चे वैशिष्ट्ये.
दिपंदर गोयल यांनी ट्विटर वर झोमॅटोच्या नवीन वैशिष्ट्याविषयी तपशील शेअर केला.
1. त्यांनी ट्विट केले की, शाकाहारी अन्न वापरणाऱ्या ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया विचारात घेऊन हे वैशिष्ट्य सुरू करण्यात आले आहे.
2. प्युअर व्हेज मोड केवळ शुद्ध शाकाहारी जेवण देणाऱ्या रेस्टॉरंटची यादी करेल.
3. या व्यतिरिक्त, या मोडद्वारे दिलेली ऑर्डर झोमॅटोच्या प्युअर व्हेज फ्लीटद्वारे हिरव्या डिलिव्हरी बॉक्ससह उचलली जाईल आणि वितरित केली जाईल.
4. मांसाहारी जेवण किंवा मांसाहारी रेस्टॉरंट द्वारे दिले जाणारे शाकाहारी जेवण प्युअर व्हेज प्लेट साठी असलेल्या ग्रीन डिलिव्हरी बॉक्समध्ये कधीही दिले जाणार नाही.
5. भारतात शाकाहारी लोकांची जगातील सर्वात मोठी टक्केवारी आहे, आणि त्यांच्याकडून मिळालेल्या एक महत्त्वाच्या अभिप्रायवरून अन्न कसे शिजवले जाते आणि त्यांचे अन्न कसे हाताळले जाते, याबद्दलची पाहणी करण्यात येईल.
झोमॅटोने “Pure Veg Fleet” का लाँच केले?
दिपंदर गोयल यांनी सांगितले की, “शुद्ध शाकाहारी डिलिव्हरीसाठी एक वेगळा फ्लीट सुरू करण्यात आला आहे, कारण काहीवेळा डिलिव्हरी बॉक्समध्ये अन्न सांडले जाते आणि अशा प्रकारे, अन्नाचा वास न कळत पुढील ऑर्डरवर नेला जातो. या कारणास्तव व्हेज ऑर्डरसाठी फ्लीट वेगळे करावे लागले.” ग्राहकांच्या आहारातील प्राधान्ये सोडवण्यासाठी या फ्लिट ला लाँच केले असे देखील त्यांनी नमूद केले आहे.
‘झोमॅटो हे कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय प्राधान्यांची सेवा करत नाही किंवा त्यांना दूर करत नाही. झोमॅटो भविष्यात विशेष ग्राहकांच्या गरजांसाठी अधिक प्लेट्स जोडण्याचा विचार करत आहे.’ असेही झोमॅटोचे सीईओ यांनी सांगितले आहे.