*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
मो.जावेद यांचे प्रतिपादन ,उर्दू शाळेत स्नेह संमेलन.
शाळेतील वार्षिक स्नेह संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळून सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन उर्दू शाळेतील शिक्षण समितीचे अध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे दि.5 मार्च रोजी विविध सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अधक्षस्थानी पोलीस निरीक्षक सुनील हुड हे होते.तर प्रमुख अतिथि म्हणून नगर सेवक शेख कादर शेख रहेमान,नगर सेवक शेख अहेमद शेख करिम ,बबलू भाई नगरसेवक सुरेश वर्मा , नगरसेवक अभय तातेड, नगरसेवक अनिकेत पोहकार ,नायब तहसीलदार रामटेके ,शेख अब्बास, नईम खान, केंद्र प्रमुख शशिकांत खडसे हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आयोजित स्नेहसंमेलनात, एकूण २६ देशभक्ती पर नृत्य, नाट्य, वेगवेगळे दिखावे विद्यार्थ्यांनी सादर करण्यात आले. मात्र त्यामधून वर्ग पहिला व दुसरा च्या विद्यार्थ्यांनी ‘खौफ से जिसके भागे फिरंगी छोड के मैदान, या कव्वालीने उपस्थित प्रमुख पाहुणे व गावकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधले होते, कव्वाली मध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद साबीर सह सर्व विद्यार्थी वर कौतुकांचे वर्षाव करण्यात आला.
या वेळि केजी वन व केजी टु च्या मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेत सहभाग घेतला, नृत्यासाठी शिक्षिका शहेनाज बानो, शबाना खातुन, शाहिस्ता छवारे, मसिरा व समीरा यांनी परिश्रम घेतले. दररोज नवनवीन गोष्टी शिकून मुलांना सर्व गुण संपन्न बनवण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतोय. उर्दू शाळा बाभुळगाव चे शिक्षक अथहर अली व शेख ज़हीर शेख याकूब हे वेगवेगळया उपक्रमाच्या माध्यमातुन चित्रकलेची आवड निर्माण करीत विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे काम करत आहे.
यावेळी शाळेतील शिक्षक,शाळा समितीचे अध्यक्ष मो, जावेद, शहेजाद शेख,मोहम्मद राजिक, शेख आमिर महेमुद खान शेख जुनैद इरफान खान शेख फैसल गौसिया बाजी,साजेदा अनवर शेख,आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रम चे संचालन जाकिर हुसैन व आभार शहेजाद शेख यांनी मांनले