पकड्डीगडम जलाशय खोलीकरण कालवे दुरुस्ती सिंचनात वाढ करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल.

पकड्डीगडम जलाशय खोलीकरण कालवे दुरुस्ती सिंचनात वाढ करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल.

*चन्द्रपूर जिल्हा प्रतिनिधि प्रमोद खिरटकर*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

चंद्रपूर जिल्ह्यातील नाबार्ड पुरस्कृत सहाय्यीतदुर्गम आदिवासी भागातील सिंचन क्षमता वाढ करण्यासाठी 1990 कालावधीमध्ये प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले मात्र 11.03 दलघमी जलसंचयनसाठा अपेक्षित असताना गेल्या 30 वर्षात पाटबंधारे विभागाला जलसिंचन साठा उद्दिष्ट साध्य करता आले नाही अर्धवट झालेली कामे अर्धवट कालव्याची कामे तसेच बॅक वाटर क्षेत्रामध्ये डोंगर व मातीचे ढिगारे अर्धवट असल्याने सात दलघमीपेक्षा अधिक पाणीसाठा करता आला नाही.

याबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधी व नागरिकांची मागणी दुर्लक्षित राहिली त्याच प्रकल्पातून अंबुजा सिमेंट कंपनीला उद्योग वापरासाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने लाभ क्षेत्रातील दहा ते बारा गावे सिंचनापासून वंचित होती तसेच जलाशय लगत असलेल्या एक किलोमीटर अंतरावरील पिपरडा कुसळ धानोली वनसडीया शिवारातील बांधावर देखील पाणी पोहोचले नव्हते यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी केली होती.

चंद्रपूर जिल्ह्याचे विकासाची धडपड असलेले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत गंभीर दखल घेत पाठपुरावा करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने शासनाला अहवाल सादर करण्याचे व आवश्यक ती विकास तत्व लाभ क्षेत्रातील लघु कालवे मुख्य कालवे खोलीकरण तसेच अंबुजा सिमेंट कंपनीचा पाणी करा.

संपुष्टात आणण्यासाठी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडून तातडीने अहवाल मागितला असून या भागातील 50% वंचित असलेल्या आदिवासी व ग्रामीण शेतकऱ्यांमध्ये अपेक्षा बळकावले आहे लाभ क्षेत्रातील खिरडी वडगाव या शिवारात अजूनही कालव्याला पाणी गेले नाही तसेच कंपनीचा करार संपुष्टात आल्यामुळे व पर्यायी पाण्याची व्यवस्था कंपनीने केली असल्याने करार रद्द करून विकास कामे खोलीकरण व जलसंचयनसाठा वाढवण्यासाठी नियोजनाचे उपाय करण्यात यावे.

अशी मागणी करण्यात आली होती याची दखल घेत शासनाकडूनपाठपुरावा सुरू झाल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागात दुरुस्तीचे काम निधी अभावी करण्यात आलेले नाही हे विदारक चित्र या भागात असून लाभ क्षेत्रातील अनेक शेतकरी बांधावर पाणी न गेल्यामुळे हरितक्रांतीचे स्वप्न धुळीस मिळाले होते.

मात्र राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विदर्भातील 26 प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून धूळ खात पडले होते यापैकी 12 प्रकल्प पूर्णत्वास निधीची तरतूद करून कामे पूर्ण झाल्याने विदर्भातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे या भागात देखील अमलनाला पकड्डीगडम डोंगरगावसिंचन प्रकल्प आहेत मात्र अजूनही पाटबंधारे विभागाचे प्रकल्प उभारणीच्या निकष व अपेक्षित सिंचन साध्य झाल्या नसल्याने शेतकरी सतत पाण्यासाठी धडपड करीत होते.

मात्र कोरपणा तालुक्यातील दुर्गम भागातील पकडी गडडम जलाशयाच्यामागणीची दखल उपमुख्यमंत्री व पालक मंत्र्यांनी घेतल्यामुळे अनेक दिवसाची मागणी पूर्ण होण्याची आशा बळकावली आहे याबद्दल या ।भागातील शेतकऱ्यांनी खोलीकरणासह कालव्याची कामे तातडीने पूर्ण होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − one =