Chandrapur News: गडचांदूर येथे तालुकास्तरीय लोहार समाज वधु वर परिचय मेळावा थाटात संपन्न.

Chandrapur News: गडचांदूर येथे तालुकास्तरीय लोहार समाज वधु वर परिचय मेळावा थाटात संपन्न.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Chandrapur News: विदर्भ लोहार व गाडी लोहार तत्सम जाती महासंघ नागपूर लोहार समाज विकास संघटना चंद्रपूर व लोहार समाज शाखा गटचांदूर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती व लोहार समाज उपवर वधू चा परिचय मेळावा नुकताच गडचांदूर येथे नव्यानेच समाजाने अधिग्रहीत केलेल्या जागेवरती घेण्यात आला. याप्रसंगी जयंती कार्यक्रमास उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराव भोंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.

तर उद्घाटक म्हणून राजुरा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार संजय धोटे व अध्यक्ष म्हणून लोहार समाज विकास संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष डॉक्टर एस एस कामटकर उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी अल्पसंख्यांक असलेल्या लोहार समाजाला प्रगतीच्या प्रवाहामध्ये आणण्याकरिता शासनाच्या माध्यमातून विश्वकर्मा योजना लागू करण्यात आली.

असून त्याचा फायदा समाजाने घ्यावा व स्वतःचा आर्थिक उत्कर्ष करावा याशिवाय समाजाने अधिग्रहित केलेल्या जागेवरती येणाऱ्या काळात फार मोठे भवन बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून दिल्या जाईल असे आश्वासन उपस्थित उद्घाटक महोदयांनी दिले याशिवाय समाजाने शिक्षणाची कास धरावी व लघुउद्योग करावे कारण हा समाज शिल्पकार अभियांत्रिकी शिक्षण तांत्रिक शिक्षण यामध्ये कुठेच मागे नाही.

या सर्व विषय त्यांना ईश्वरानेच नैसर्गिक देणगी दिलेली आहे याचा फायदा आपण करावा असे मत माजी आमदार संजय धोटे यांनी व्यक्त केले शिवाय विशेष अतिथी म्हणून गडचांदूर नगर परिषदेचे नगरसेवक ग्रामविकास मोरे नगरसेवक निलेश ताजने प्रामुख्याने उपस्थित होते तसेच समाजाचे प्रतिनिधी म्हणून ज्यांनी लोहार समाजाला प्रगतीच्या प्रवाहात आणले व विमुक्त भटक्या जमातीच्या सोयी सवलती तसेच आरक्षण मिळवून दिले.

असे राष्ट्रीय नेते सुरेश मांडवगडे गडचिरोली यांनी समाजाला एसटी प्रवर्गाच्या सवलती मिळवून देण्याकरिता पुढील रणनीती काय असणार याशिवाय न्यायालयीन लढाई विषयी विस्तृत माहिती दिली लोहार समाज शाखा गडचांदूर यांच्यावतीने सुरेश मांडवगडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच प्रमुख अतिथी म्हणून चरणदास बावणे अध्यक्ष लोहार गाडी लोहार तत्सम जाती महासंघ नागपूर विजयराव पोहनकर जिल्हा सचिव लोहार समाज पोटजाती विकास समाज चंद्रपूर हरिदासजी चंदनखेडे, धनराजधी धुर्वे सहसचिव चंद्रपूर बंडूजी निंदेकर, छायाताई निंदेकर, भास्कर कामटकर विजय हौसकर शंकर वाघाडे या समवेत अनेक समाज प्रतिनिधी उपस्थित होते.

घटस्थापना व विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करून महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला शिवाय उपस्थित अनेक युवक युतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाच्या शेवटी कोरपना तालुक्यातील वयोवृद्ध समाज बांधवांचा शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालक प्रमोद वाघाडे यांनी केले.

तर आभार प्रदर्शन शंकर वाघाडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता लोहार समाज शाखा संघटना गडचांदूर चे अध्यक्ष कैलास हजारे, उपाध्यक्ष कवडू सदाशिव पेठकर, शंकर कवडे, अपुरकर, संजय कडू खंडाळकर, विनोद नथू वाघाडे संजय मळावी, संतोष सोनटक्के, मच्छिंद्र सोनटक्के, चंदू निंदेकर याशिवाय सर्व पदाधिकारी व सदस्य वर्गांनी परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 4 =