*तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)*
Patrakar Bhushan Awards: दैनिक विदर्भ केसरी तृतीय वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन वार्ता न्यूज समूहाचे विदर्भ उपसंपादक तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्राचे पत्रकार आयु. Rajesh Dhole यांना विदर्भ केसरी पत्रकारिता भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की. विदर्भाचा मानबिंदू दैनिक विदर्भ केसरी या वृत्तपत्र समूहाचा तृतीय वर्तमान दिन सोहळा निमित्य विविध मान्यवरांना पुरस्कारा देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार सोहळा दैनिक विदर्भ केसरीचे मुख्य संपादक,अमोल जी कंटाळे पुसद तालुका प्रतिनिधी विजय निखाते यांच्या शुभ हस्ते आयु. राजेश ढोले यांना पुष्पगुच्छ,सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला, दैनिक विदर्भ केसरीचे पुसद तालुका प्रतिनिधी विजय निखाते, दैनिक अधिकार नामाचे कैलास श्रावणे, थ्रीडी न्यूज नेटवर्क चे ज्ञानेश्वर मेटकर खडक दरी येथील सरपंच सिद्धार्थ कांबळे इत्यादी सह अनेक मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार सोहळा पुसद येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला.