Warora: International Book Day व वसंत पंचमी महोत्सव उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे साजरा व Pulwama येथील शहीद वीरांना श्रद्धांजली च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Warora: International Book Day व वसंत पंचमी महोत्सव उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे साजरा व Pulwama येथील शहीद वीरांना श्रद्धांजली च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम डाॅ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी डॉ.खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ विरुडकर वैद्यकीय अधिकारी, वंदना विनोद बरडे अधीसेवीका श्री ठाकुर,नकले परिसेवीका, गणेश तुमराम अधीक्षक, सतीश येडे बंडू पेटकर, अमोल भोग व ईतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आज दिनांक १४ फरवरी २०२४ ला इंटरनॅशनल बूक डे व वसंत पंचमी निमित्ताने सरस्वती पूजन डॉ खूजे वैद्यकीय अधीक्षक डॉ विरुडकर वैद्यकीय अधिकारी वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी केले.ईंटरनशनल बुक डे निमित्याने एक ग्रंथालय सुरू करण्याची कल्पना वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी सांगितली.रुग्ण व नातेवाईकांसाठी ग्रंथालय सुरू करण्याची सुरुवात केली.आणी त्यानिमित्ताने डॉ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांना एक बूक भेट दिली.व ग्रंथालय उभारण्याच्या कार्याला सदिच्छा दिल्या.तसेच पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.आणी सर्वांनी आपापल्या कडील पुस्तक,माॅगझीन आणुन आपण ग्रंथालय सुरू करु शकतो.