*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*
वेणी कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH40M5786 या ट्रकमधून अवैधरित्या वाहतूक करतांना तीन ब्रास रेती मिळून आली .पोलिसांनी तीन ब्रास रेती किंमत 15हजार रुपये व साडेतीन लाखांच्या ट्रकसह तीन लाख पासठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाही जमादार गणेश शिंदे व चालक संजय पवार रात्रपाळीची ग्रस्त करीत असताना दि. 6 फेब्रुवारीच्या रात्री कळंब रोडवरील नायगाव येथे केली.
जमादार गणेश शिंदे यांनी बाभूळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून आरोपी चालक प्रल्हाद ज्ञानेश्वर अत्राम 32 वर्ष रा यावली, शंतनु गजेंद्र गावंडे 24वर्ष रा.मांगसावंगी , मंगेश श्रीराम नागपुरे 38वर्ष पाचखेड या तिघांवर गुन्हा नोंदविला आहे.