*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदिब*
बाभूळगाव:- तालुक्यातीच्या राजकारण व समाजकारणातील खंबीर नेतृत्व असलेले स्व. होलेश्वर गादे यांची पुण्यतिथी दि. 5 रोजी स्थानिक गादे चौक येथे साजरी करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते, गावकरी मंडळींनी आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात सहभाग नोंदविला. सर्व प्रथम गादे चौक स्थीत स्व. होलेश्वर गादे यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन स्व. गादे यांचे पुत्र निलेश गादे यांनी केले होते. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डाॅ. रमेश महानुर, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनमोहन भोयर, जागेश्वर गादे, उपनगराध्यक्ष श्याम जगताप, आम आदमी पार्टीचे वसंतराव ढोके, प्रकाश जानकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष मोहन बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत वानखडे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक सागर धवने,
खरेदी विक्री संघ अध्यक्ष श्रीकांत कापसे, प्रविण खेवले, बाजार समिती संचालक आशिष सोळंके, बाजार समिती सचिव विलास गायकवाड, मुकूंद दंदे,प्रकाशचंद छाजेड, भारत इंगोले, भाजपा शहर अध्यक्ष अनिकेत पोहोकार, बाभूळगाव प्रेस क्लब अध्यक्ष आरीफ अली, सचिव विक्रम ब-हाणपुरे, कोषाध्यक्ष सचीन पुरी, सुभाष मोटके, विजय बनसोड, संकेत मोटके, विजय पोफारे, प्रदीप नांदुरकर, निलय पोफारे, अभिषेक मोटके, चंद्रशेखर अलोणे, देविदास राणे, शेखर बोथरा, पृथ्वीनंदन निवल, आकाश गुप्ता, गितेश नक्षणे, सुभाष नखाते आदि उपस्थित होते.