जि.प.प्राथमिक शाळा पाथ्रड देवी येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
अभिनव डिजिटल शाळा निर्माण करण्याचा केला संकल्प.
दारव्हा…जि. प. प्राथमिक शाळा पाथ्रड देवी शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना विरंगुळा व कलागुणांचा विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यापैकीच सांस्कृतिक कार्यक्रम हा एक भाग आहे.
सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून श्री.अविपाल वानखडे तलाठी हे होते, तसेच प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.पं.पाथ्रड देवी सरपंच, व उपसरपंच,ग्रा.पं.पाथ्रड देवी ग्रामसेवक, शाळासमिती व्यवस्थापक अध्यक्ष, शाळासमिती व्यवस्थापक उपाध्यक्ष व शाळासमिती व्यवस्थापक सदस्य, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका हे होते. या प्रसंगी गावातील शाळेचा विकास साधायचा असेल तर गावातीलच लोकांना तों साधावा लागेल असे मत, त्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन शाळाविकासाकरिता झोकून द्यावे लागेल.
शाळा ही गावाचा आरसा असतो आपला पाल्य आपल्याच गावात शिकला पाहिजे असे मत प्रमुख अतिथी पारवेकर सर खांदवे सर मुख्याध्यापिका रोहनकर मॅडम आरू सर घोडाम सर यांनी व्यक्त केले. शाळेला प्रगतीकडे घेऊन जाणारे शिक्षक या गावाला लाभले असे मत शाळा व्यवस्थापक समितीचे उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ग्रामस्थाना शाळा अभिनव डिजिटल शाळा करण्याचा प्रस्ताव पालकासमोर येथील मुख्याध्यापिका रोहनकर मॅडम यांनी ठेवला त्याला सर्व पालकवर्गानी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे अभिवचन दिले या एक महिन्यामध्ये लोकसहभाग निर्माण करुन एक अभिनव डिजिटल शाळा निर्माण करण्याचा संकल्प उपस्थित सर्व ग्रामस्थ यांनी मनोदय व्यक्त केला.तसेच वानखडे तलाठी साहेब यांच्याकडून मेडल देण्यात आले.
सांस्कृतिक महोत्सव प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनांनिमित्य इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये भाषणे सादर केली. तदनंतर विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार, नृत्य, नाटिका, सादर केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक, गावातील युवकवर्ग, यांनी परिश्रम घेतले.भारतीय संस्कृतीची परंपरा दर्शवणारी विविध नृत्यगीते विद्यार्थ्यांनी सादर गोंडीनृत्य, जेजूरी नृत्य गीत केलीत. शेतकरी गीत, देशभक्तीपर गीत, कोळीगीत, लावणीनृत्य, आदिवासी नृत्यगीत, ढेमसा या सर्व नृत्यगीताने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनाही बालकलाकारांना बक्षिसाच्या रूपात भरभरुन प्रतिसाद देत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खांदवे सर यांनी तर आभार प्रदर्शन पारवेकर सर यांनी केले. शाळेकरिता शिक्षक घेत असलेले श्रम हे उल्लेखनीय आहे असे मत पालकांनी व्यक्त केले.