*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*
बाभुळगाव: विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच समाजात वावरताना व्यवहारिक ज्ञान मिळावे व सुप्त गुणांना वाव मिळावा या करिता
बाभुळगाव येथील जि. प. उच्च प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी शाळेत दि. १९/१/२०२४ ला बाल आनंद मेळावा आणी हस्तकला प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विद्यार्थांनी विविध वेशभुषा सादर केल्या. आनंद मेळावा कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून.
सोनल तातेड अध्यक्ष शा. व्य. स. या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून बाभुळगाव पो. नि. सुनीलजी हुड गटशिक्षणाधिकारी.गणेश मैघणे, केंद्रप्रमुख .शशीकांत खडसे. नरेश भाऊ सातपुते उपाध्यक्ष शा. व्य. स.निखिल तातेड.अजमत मुल्ला,अंकुश सोयाम, मंजुश्री नांदुरकर.अस्मिता बारटक्के ,सारीका डांगे , जावेद भाई अध्यक्ष शा. व्य स. उर्दू शाळा, शहेजाद शेख,मो.राजिक हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व फीत कापुन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले व शाळकरी चिमुकल्यांद्वारे स्वागत नृत्य सादर करण्यात आले .यावेळी साधनव्यक्ती सारीका ठाकरे,दिपाली दिक्षित यांचीही उपस्थिती होती. यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या स्टाॅल वर जाउन त्यांनी तयार केलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेत त्यांच्याशी संवाद साधला व सोबतच हस्तकला प्रदर्शनी ला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून तयार केलेल्या हस्तकला चे कौतुक करत त्यांचे परीक्षण केले.
या वेळी पालकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व त्यांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत भुराणे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, संतोष लिचडे , शाम लोखंडे, सुरेश बोबडे, स्मिता फुलकर, जयमाला तिखे, वैशाली बोरकुटे, ममता बिन्नोड, ज्योति गाजलेकर, प्रगति चींचे, रुबिना युसूफ छव्वारे, सुनिता जयसिंगपुरे, श्रध्दा येवतीकर, मिनाक्षी ईंगोले, विठ्ठल पींगळे, संख्या जांभुरे,अनिता मोहनकर,छोटीताई चीव्हाणे आदिंनी परिश्रम घेतले.