बाभूळगाव शिवसेना पक्षाच्या वतीने एक हजार किलो साखरीचे वाटप.
*बाभूळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*
बाभूळगाव येथील शिवछत्रपती चौकात दि. २२ रोजी दुपारी १२.३० वाजता श्रीराम प्राणप्रतिष्ठा तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांची पुर्तता झाल्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने शहर व परिसरातील नागरिकांना एक हजार किलो साखरीचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री तथा मृद जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांच्या संकल्पना व पुढाकारातून शिवसैनिकांनी साखर वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. काश्मीर मधुन कलम ३७० रद्द करण्यात आली, तसेच अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण झाले, या स्व. बाळासाहेबांच्या दोनही स्वप्नांची पुर्तता झाली. त्याच प्रमाणे 23 जानेवारी स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीचे औचित्य साधून ना. संजय राठोड यांच्या पुढाकाराने साखर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिवसेनेने या दिवसाला स्वप्नपुर्ती दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.
आनंदाच्या दिवशी गोड पदार्थाचे वाटप घराघरात करता यावे, या उद्देशाने प्रत्येक कुटूंबाला किमान एक किलो साखर देण्याचा मनोदय शिवसैनिकांनी केला होता. या प्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार, उपजिल्हा प्रमुख सचिन महल्ले, तालुका प्रमुख वसंत जाधव, शहर प्रमुख प्रविण लांजेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब गौरकार, माजी शहर प्रमुख विक्रम ब-हाणपुरे, नगर सेवक अमर सिरसाठ, अभय तातेड.
नईम खान, गौरव तातेड, स्वप्नील खोडे, विक्रम लाकडे, नितीन महालगावे, अमोल लाकडे, चंद्रकांत बोरकर, नरेश सातपुते, जयवंत ढोबळे, योगेश किन्नाके, किशोर मेश्राम, रवि उसरे, शुभम वाघ, राजेंद्र शिंदे,गजानन कोठेकार,गितेश नक्षणे,नरेश दख्खनकर, हेमराज शिंदे,सतिश जांभुळकर,दत्ता दांडेकर,मयुर घटे, आदि शिवसैनिक मोठया संख्या ने उपस्थित होते