विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी आपले बँक खाती आधार संलग्न करणे आवश्यक.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना योजनेकरीता उघडण्यात आलेली बँक खाती आधार संलग्न असणे आवश्यक आहे.
विशेष सहाय्य कार्यक्रमातंर्गत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना आधार क्रमांक संलग्न केल्यानंतरच अर्थसहाय्याचे वाटप करण्याबाबत संदर्भीय शासनशासन निर्णय, क्र. विसयो-२०१८/प्र.क्र.६२/विसयो, दिनांक २० ऑगस्ट, २०१९. निर्णयान्वये कळविण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. द्वारे एका महिन्यात करण्याचे निदेश मा. मुख्यमंत्री महोदंयानी दिलेले आहेत. तरी सदर योजनेतील लाभार्थ्यांना डी.बी.टी. द्वारे अर्थसहाय्य वितरण करण्याकरीता योजनेतील सर्व लाभार्थ्यांची योजनेकरीता उघडण्यात आलेली बँक खाती आधार संलग्न असणे आवश्यक आहे. सदरहू योजनेतील सर्व लाभार्थ्यांची योजनेकरीता उघडण्यात आलेली बैंक खाती दिनांक १५ जानेवारी 2024पर्यंत आधार संलग्न करावी.