अज्ञात चोरट्यांनी केली EVM मशीन ची तोडफोड!

ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊन मधून चोरीचा प्रयत्न, पोलिसात गुन्हा दाखल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

धुळे शहरातील धान्य गोडाऊन येथे मतमोजणी केंद्रावर EVM मशीन ठेवण्यात येतात.या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड करीत तसेच या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड करीत काही साहित्य चोरून नेण्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील धान्य गोडाऊन मध्ये ज्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडते त्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून या ठिकाणी असलेल्या काही ईव्हीएम मशीन ची तोडफोड केल्याची तसेच मतमोजणीचे साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी काल रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्रशासनाने या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हलवण्यास सुरुवात केली.

असून दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड केल्याने या चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले असताना अचानक झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी याठिकाणी दाखल झाले. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील याठिकाणी दाखल झाले. याप्रकरणी आपण देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिली आहे. याबाबत माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील, उपमहा नगर प्रमुख कैलास मराठे यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले.

सदरचा प्रकार हा बेजबाबदारपणातून झाल्याचा आरोप करीत आगामी लोकसभा निवडणुकीत हे ईव्हीएम मशीन उपयोगात आणण्यात येण्याची शक्यता असल्याचे देखील गंभीर आरोप करीत याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी यावेळी केली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

four × four =