वंचितला सोबत घेतल्याशिवाय भाजपचा पराभव शक्य नाही – Dr Niraj Waghmare
*बाभूळगाव, ता. प्र.मोहम्मद अदिब*
बाळासाहेब आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला सोबत घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.परंतु आजपर्यंत वंचितांचा प्रस्ताव इंडिया आघाडीने स्वीकारला नाही. त्यामुळे काँग्रेस ही भाजपाची वाट मोकळी करून देत आहे. व काँग्रेस भाजपाची बी टीम तयार करतांना दिसत आहे. असा आरोप करीत वंचितला सोबत घेतल्याशिवाय भाजपाचा पराभव होऊ शकत नाही. आगामी सार्वत्रिक निवडणुकीतही चांगले यश मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली आहे.
असे मत वंचितचे जिल्हाध्यक्ष Dr Niraj Waghmare यांनी व्यक्त केले. आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचे पडघम वाजत असून त्यानिमित्याने बाभुळगाव येथे कार्यकर्त्याचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने विश्राम गृह येथे दि.4जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मत व्यक्त केले आहे.
राजकारणात वंचित बहुजन आघडीला एक महत्वाचे स्थान प्राप्त झाले असून आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय केवळ वंचित बहुजन आघाडी देवू शकते ,संपूर्ण जिल्हात वंचित बहुजन आघाडीला यश कसे प्राप्त करता येईल व वंचित घटकाचे सत्तेचे द्वार कसे खुले होतील व येणाऱ्या लोकसभा,विधान सभा, स्थानिक स्वराज संस्था या निवडणुकीत वंचित घटकाचे लोकप्रतिनिधी निवडून कसे येथील या करीता पूर्ण ताकतीने निवडणूक लढण्याचे मत यावेळी लक्ष्मीकांत लोळगे यांनी व्यक्त केले.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष डॉ.निरज वाघमारे, पश्चिम विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा धम्मावर्ती वासनिक, जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, युवा आघाडीचे आकाश वाणी, जिल्हा महासचिव महिला आघाड़ी सरला चचाणे, आनंद भगत,दीपक मनवर,दिलिप वाघमारे,अजमल खान पठान, राहुल विहरे, विनोद वासे, आदि मान्यवर उपस्थित होते यावेळि पदमाकर कावळे, विनोद वासे, विलास मुनेश्वर,विशाल राऊत, सुशील लांजेकर,राजनंद बनसोड,सुमेघ कावळे,कांचन नाईक,सुरज भितकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.