बाभुळगावचे स्वस्त धान्य दुकानदार संपात सहभागी.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
बाभुळगाव तहसीलदार यांना दिले निवेदन.
बाभुळगाव तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांनी राशन वाटप बंदचे आंदोलन पुकारले असून या संबंधीचे निवेदन बाभूळगाव येथील तहसीलदार यांना दिले आहे. ऑल इंडिया फेयेर प्राईज शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली व अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांनी केलेल्या बेमुदत बंद आवाहनानुसार राज्यातील सर्व स्वस्त धान्य दकानदारांच्या मागण्या व निवेदनाची राज्य सरकारने व केंद्र सरकारने कोणतीही दखल न घेतल्यामुळे व सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे दिनांक 1 जानेवारी 2024 पासून संघटनेच्या पुढील आदेश येईपर्यंत येथील तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांनी राशन वाटप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अध्यक्ष दिलीप वाघमारे, सचिव पद्माकर ठाकरे, उपाध्यक्ष अशोक नाईकवाडं,ए.वाय.पठाण, एन.व्हि.मदनकर, साईबाबा महिला बचत गट ,विजय येंडे,संतोष अजबले, जयश्री नेवारे ,वेणूताई देऊळकर संजय ठाकरे, पी.जी. ए .एन. देशमुख एस. पी. ठाकरे एन. आर .गावंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.