सरुळ येथे प्रीथमजी महाराज पुण्यतिथी उत्सव, संगीत भजन मैफीलचे आयोजन.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

सरुळ येथे  प्रितामजी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त सकाळी ४ ते ७ यावेळात काकड आरती, १० ते २ हभप. माउली ज्ञानेश्वर महाराज कोठुळे (भिवंडी, जि. ठाणे) यांचे कीर्तन होईल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

शंकरराव वैरागकर (नाशिक), बाळासाहेब वाईकर (अहमदनगर), जगन्नाथराव वाडेकर (पंढरपूर), धोंडीराम बळवंत (परळी वैजनाथ), जगदीश चव्हाण (नाशिक), प्रवीण देशमुख (वर्धा), कार्डीकर (मुंबई), मृदंग वादक आसाराम सावळे यांचा रात्री  10वाजता संगीत भजन मैफील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थानचे व्यवस्थापक प्रा. भीमसिंग सोळंके यांनी दिली.

श्री संत बाबा प्रिथमजी महाराजाच्या पुण्यतिथी निमित्ताने सरुळ परीवर्तन ग्रामपंचायत, गुरुदेव सेवा मंडळ, बालगोपालांनी गावातील रस्त्यात असलेले माती खताचे ढिगारे उचलुन रोडच्या दोन्हीं बाजूला लावून काटेरी झाडे झुडपे काढून गाव स्वच्छ करून स्वछता अभियान राबविले. यात आनंदजी सोळंके, सरपंच हिराताई कापसे, उपसरपंच राहुलजी वाघ, गजानन थोटे ग्रा. प. सदस्य मोहनजी नागोसे, सदस्या शारदा वानखेड़े, अजय गायकवाड़ सर्व गावातील नागरीकांनी स्वछता अभियान मध्ये सहकार्य केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

13 − two =