Sushganga Public School मध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा.
*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे*
वणी – येथील सूशगंगा पब्लिक स्कूल मध्ये महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमत्ताने शाळेत गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य मा. प्रवीण दुबे यांच्या शुभहस्ते झाले.
उद्घटनप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मा. प्रवीण दुबे यांनी गणिततज्ज्ञ रामानुजन यांचे गणित क्षेत्रातील योगदान निर्देशित करीत हा दिवस हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस असल्याचे विषद केले.
शाळेचे संस्थापक श्री. प्रदीप जी बोंगिरवर व व्यवस्थापकीय संचालक श्री. मोहन जी बोनगिवर यांनी विद्यार्थानी तयार केलेल्या गणितीय मॉडेल्सचे कौतुक केले व राष्ट्रीय गणित दिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या.
उपरोक्त प्रदर्शनाचे आयोजन नूरसायमा खान, मुस्कान शेख व आलिया शेख या शिक्षकांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात आले. वर्ग दुसरीच्या विद्यार्थ्यांनी भूमितीय आकार व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी त्रिकोनमितीवर आधारित मॉडेल्स तयार केले होते.
स्कूल हेड बॉय कृष्णा बिजवे यांनी झोपेतून उठले की आपले लक्ष घड्याळाकडे जाते आणि तिथूनच गणित सुरू होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच गणित वापरतात. दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत गणितातील संकल्पना वापरल्या जात असून गणित मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.