कंकरवाडी येथे आमदार अमित झनक यांची भेट.
*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते*
रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी घराला आग लागून अख्खे घर जळून खाक झाले आहे कंकरवाडी येथील हसीना बी यांच्या घराला आग लागून जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे.
शेख हसीना बी ही शेतमजूर महिला असून आपली सासू व एक मुलासह आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवत असे व मुलगा सुद्धा सोबत काम करून आईला हातभार लावत असे मुलगा व आई यांनी शेतामध्ये सोयाबीनची कामे व इतर कामे करून मिळवलेली मजुरीचे पैसे सर्व मायापुंजी व मुलाने विकलेली मोटरसायकलचे पैसे हे सर्व घरामध्येच जमा करून ठेवलेले होते ते सर्व पैसे जळून खाक झाले व उदरनिर्वाहाचे सर्व सामान सुद्धा जळाले होते या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे फक्त अंगावरचे कपडे हे शिल्लक होते.
असे समजतात विधानसभा मतदारसंघातील आमदार Amit Zanak साहेब यांनी तात्काळ कंकरवाडी येथे 30 नोव्हेंबर रोजी भेट देऊन वस्तुस्थिती पाहिल्यानंतर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले सोबत बबनराव सानप, भीमराव शेजुळ, रामेश्वर देवकर ,शिवाजीराव काकडे, सचिन इप्पर, गजानन मुंडे, प्रभुजी कोल्हे प्रदीप कोल्हे, निजामभाई सखाराम कोल्हे, प्रभुजी केळे, प्रल्हाद देवकर ,माधव जाधव ,भागेश मुंडे, गजानन खडसे, अर्जुन जाधव, बबनराव गारडे, तानाजी ठाकरे, बबन जाधव आदी गावकरी मंडळी उपस्थित होते.