यवतमाळ जिल्ह्य़ातील केवळ आठ तालुक्यात १६ महसूल मंडळात प्रशासनाने दुष्काळ जाहीर करा या मध्ये आर्णी तालूका वगळण्यात आलेला आहे जून मध्ये उशीरा आलेला पाऊस नंतर सतत आलेला पाऊस त्या मूळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दिवाळीत येणार सोयाबीन चे पिक हातातून गेले एकरी एक ते दोन किंटल सोयाबीन शेतकऱ्याच्या हातात आले.
उत्पन्नात 60 ते 40% घट झाली तरी प्रशासनाने 50% जवळ पास आणेवारी काढली हे तालुक्यातील शेतकऱ्याची एक प्रकारची थट्टा करत आहे कृषी विभाग व महसूल विभागांना काय तिसऱ्या डोळ्यांने सर्वेक्षण केलं काय असा संवाद सचिन यलगंधेवार यांनी विचारला आर्णी तालुका हे यवतमाळ जिल्ह्य़ातील सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त तालूका आहे या कडे शासन व लोकप्रतिनिधीं लक्ष देत नाही आहे महाराष्ट्रात एक मेकाण वर नुसती चिखल फेक होत आहे.
शेतकऱ्याकडे कोणाचे लक्ष नाही तालुक्यातील शेतकरी नापिकी मूळे कर्ज बाजारी होत आहे व परराज्यात जात आहेत 1रूपयात पिक विमा अजून शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला नाही आर्णि तालुक्यात १२ तासात १८३ मी. मी .पावसाची नोंद झाली ते पाऊस काय अरुणावती प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे झाला काय तसेच आपल्या ईकडे जे हेलिकॉप्टर बचाव कार्याला आले होते ते काय पर्यटन करण्यासाठी आले होते का असा सवाल सचिन यलगंधेवार यांनी केला.