Nagar Parishad Umarkhed: शहरातील हनुमान वार्डातील रस्त्याचे काम पुसद येथील नामांकित कंत्राटदाराला देण्यात आले होते त्या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारा दगड हा निकृष्ट दर्जाचा रस्त्यावर आणून टाकण्यात आला ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी नगरपरिषद बांधकाम विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर सदर निकृष्ट विहिरीचा दगड हा संबंधित ठेकेदाराला उचलण्यास लावण्यात आला.
सद्यस्थितीत उमरखेड तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा तथा आमदार नामदेव ससाने यांच्या प्रयत्नातून अनेक विकासात्मक कामे मंजूर होत आहेत. मागील पाच वर्षात कधी नव्हे एवढा निधी उमरखेड नगर परिषदेला प्राप्त झाला व त्या अनुषंगाने कामे सुरू आहे.सद्यस्थितीत उमरखेड नगर परिषदेला नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी दहा कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले.
असून त्यातील उमरखेड नगरपालिका अंतर्गत हनुमान वार्डातील नाथ नगर प्रभाग क्रमांक 1 मधील भरकाडे ते पंडागळे यांच्या घरापर्यंत डांबरीकरण तसेच कब्रस्तान वॉल कंपाऊंड पासून भरकडे ते इप्तेखार सर यांच्या घरापर्यंत डांबरीकरण आणि लादनीकरण असे एकूण 33 लाख रुपयाचे काम पुसद येथील गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून त्यांनी सदर कामाकरिता दगड आणून टाकण्याचे काम सुरू होते.
परंतु सदर दगड हा निकृष्ट तथा विहिरीचा असल्याचे स्थानिकांच्या लक्षात येतात त्यांनी नगरपरिषदेचे अभियंता रवी गोविंदवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून देताच त्यांनी सदर दगड तिथून उचलण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले व तात्काळ दगड उचलण्याचे काम सुरू झाले एकूणच नागरिकांच्या सतर्कतेने सदर होणारे निकृष्ट काम थांबवल्यामुळे शहरात इतर ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्याची कामे दर्जेदार होतील व निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून शासनाच्या निधीची विल्हेवाट लावणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानीला अंकुश लागेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे या घटनेमुळे ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
चौकट ।
रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट स्थानिकांचा आरोप.
गुणनियंत्रण पथकाचा अहवाल दडपून वापरण्यात येणारा दगड व खडी निकृष्ट असल्यामुळे नवा डांबरीकरण रस्ता किती काळ टिकेल याची खात्री नसल्याचे स्थानिकांनी गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी पुसद यांच्यावर असा आरोप केला आहे. तालुक्यात मागील अनेक योजनेतील कामे याच गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला का देण्यात येतात ?… !