Prakash Ambedkar : संविधानाचे रक्षण करण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होत असलेल्या Samvidhan Samman Rally सर्वांनी सहभागी व्हावे..!!
Prakash Ambedkar Samvidhan Samman Rally : वंचित *बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम यांचे सर्वांना आवाहन.
मुळावा : संघ भाजपाने भारतीय संविधान आणि लोकशाहीचा बीमोड करुन मनुस्मृतीनुसार देशाची व्यवस्था निर्माण करण्याचा विडा उचलला आहे.लोकशाहीचे सर्व स्तंभ विकल्या गेलेले आहेत, कंत्राटीकरणाचा सपाटा सुरू आहे, शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे, शिक्षण घेऊन करोडो तरुण बेरोजगार होऊन दर दर भटकत आहेत, प्रत्येक जातीचा धर्माचा नागरिक दहशतीमध्ये जगत आहे, नव्याने मोदी नावाचा हिटलर जन्माला घालून गेल्या दहा वर्षापासून देशात प्रचंड महागाई मानवी नरसंहार करून हिटलर पेक्षाही क्रूर असा क्रूरकर्मा म्हणून मोदीने दहशत निर्माण केली आहे, 2024 मध्ये भारतीय संविधान आम्ही बदलणार त्यासाठी विधानसभा लोकसभा राज्यसभेमधे बहुमत आणून जगातील सर्वोत्तम अशी लोकशाही उध्वस्त करण्याचा घाट भाजपने घातला आहे.
त्याला हाणून पाडण्यासाठी एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव बहुजनांचे नेतृत्व लढत आणि झगडत आहे, यापुढे आपल्याला स्वस्त बसता येणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली हजारो वर्षांची गुलामीची परंपरा बदलली आणि देशातल्या तमाम नागरिकांना सर्व हक्क अधिकार प्रदान केले, आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेली लोकशाही टिकवण्यासाठी पुन्हा एकदा आंबेडकरच सरसावले आहेत.
म्हणून 25 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होत असलेल्या संविधान सन्मान रॅलीत सर्व स्तरातून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आंबेडकरांचे हात मजबूत करा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम व जिल्हा प्रभारी मोहन राठोड, यांनी उमरखेड येथील विश्रामगृहामध्ये केले, सोबत प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा संघटक विजयराव लहाने, जिल्हा उपाध्यक्ष शामराव कानीराम राठोड, हेही उपस्थित होते, वंचित बहुजन आघाडी उमरखेड येथील तालुका अध्यक्ष संतोष जोगदंड तालुका उपाध्यक्ष विनोद गाडगे विनोद बर्डे संबोधी गायकवाड जान टी भाऊ विनकरे बाबुराव देवानंद पाईकराव नवसागरे यासह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.