दारव्हा तालुका प्रतिनिधी: चेतन पवार
दारव्हा-यवतमाळ मार्गावर वाहतूक ठप्प ; शेलोडी येथील शेतकऱ्यांचा सहभाग.
रब्बीची पेरणी करून जेमतेम सात-आठ दिवस झालेत मात्र सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा होत नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या शेलोडी येथील शेतकऱ्यांनी दारव्हा-यवतमाळ महामार्गावर शेलोडी येथे बुधवारी दुपारी रास्ता रोको केला.महावितरणाच्या अभियंत्यांनी सुरळीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे रास्तारोको आंदोलन थांबवण्यात आले.
शेलोडी परिसरातील सात-आठ दिवसापासून रब्बीची पेरणी सुरु आहे,मात्र सिंचनासाठी सुरळीत वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.काही बिघाड झाल्यास Mahavitran चे कर्मचारी,अधीकारी फोन उचलुन सहकार्य करीत नसल्याने न्याय मागावा तरी कुणा कडे अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
शिवाय कर्मचारी,अधीकारी मुख्यालयी उपस्थित नसतात त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वेळ लागतो, अश्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे हरभराव गहू पेरा उलटण्याची शकत्या बळावली आहे कृषीसाठी महावितरण आठ तास वीज पुरवठा करते ,परंतू तासनतास वीज पुरवठा खंडित होते या सर्व त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी अखेर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महावितरणचे अभियंता यांनी शेतकऱ्यांना सुरळीत वीज देऊ तसेच इतर मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन तूर्तास स्थगीत करण्यात आला.
रब्बीची पेरणी करून जेमतेम सात-आठ दिवस होऊन गेले मात्र गेल्या चार दिवसांपासून शेलोडी फीडरचा वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे पेरलेल्या पिकांना पाणी देणे शक्य होत नाही.तसेच जिव मुठीत धरून रात्री वन्यप्राण्यांपासुन पिकाचे रक्षण करावे लागते ,त्यामुळे महावितरण ने सुरळीत वीज पुरवठा करावा.
– गोपाल बोबडे शेतकरी शेलोडी