सापडलेला मोबाईल मूळ मालकास परत; वयोवृध्द ऑटोचालक अब्दुल गफुर अब्दुल शहिद यांचा प्रामाणिकतेचे कौतुक.

सापडलेला मोबाईल मूळ मालकास परत; वयोवृध्द ऑटोचालक अब्दुल गफुर अब्दुल शहिद यांचा प्रामाणिकतेचे कौतुक.

पांढरकवडा: अनेकदा फोन हरविण्याच्या घटना घडत असतात, मग कुठे रस्त्यात, बसमध्ये, अगदी कुठेही. मात्र अनेकदा हे मोबाईल सापडत नाहीत. पण काहीवेळा माणुसकीमुळे अनेकजण मोबाईल परत करतात. आज प्रत्येकाजवळ स्मार्ट फोन आहे, मात्र एकदा हरवला की परत मिळणे कठीण होऊन बसते. तर काहीवेळा अनेक अनोळखी माणसे स्वतःहून मोबाईल परत करत असतात.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तसाच काहीसा प्रकार शहरातील बस स्थानक परिसरात पहायला मिळालं.आज सकाळी वयोवृध्द अटो चालक अब्दुल गफुर अब्दुल शहीद रा.इंदिरा नगर पांढरकवडा येथील रहिवासी हे नेहमी प्रमाणे बस स्थानक परिसरात अटो पाँइंट येथे असतांनी त्यांना एका कचर्याचा ढिगार्यात रेडमी कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत विस हजार रुपये सापडला.

त्यांनी सदविवेक बुद्धीने सापडलेला मोबाईल पांढरकवडा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी इमरान शेख व गणेश ईसाळ यांच्या स्वाधीन केला. पांढरकवडा पोलीसांनी संबंधित मोबाईलच्या मूळ मालकाचा शोध घेऊन मालक तुळसीराम निमसरकर (रा. महादेव नगर ) यांना त्यांचा हरवलेला मोबाईल परत दिला. सापडलेला मोबाईल पोलिस ठाण्यात आणून प्रमाणिकपणा दाखविल्याबद्दल अब्दुल गफुर अब्दुल शहीद यांचा पोलिस विभागातर्फे कौतुक करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − seventeen =