Electoral Roll: आठ हजार मतदार वगळले तुमचे नाव यादीत आहे का ?

Electoral Roll: आठ हजार मतदार वगळले तुमचे नाव यादीत आहे का ?

आठ मतदारसंघाची स्थिती, दुबार, मृत, स्थलांतरित नावे वगळली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Electoral Roll: आयोगाद्वारा मतदार यादी अपडेट केली जात आहे. जिल्ह्यातही याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. ५ जानेवारी ला प्रसिद्ध मतदार यादीत २४,००,६६२ मतदार होते. यामध्ये दुबार नावे, मृत व स्थलांतरित मतदार वगळण्यात आल्याने मतदार यादीत तब्बल ८,०४५ नावे वगळली गेली आहेत.

त्यामुळे मतदार यादीत मतदारसंख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. येणारे वर्ष सार्वत्रिक निवडणुकांचे आहे. यामध्ये लोकसभा, विधानसभा महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी भारत निवडणूक दरवर्षी मतदार यादीचे पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविला जातो. नवमतदारांची नोंदणी व्हावी याशिवाय विमुक्त जाती, भटक्या जमातीमधील मतदारांची नाव नोंदणी व्हावी, यासाठी जिल्हा निवडणूक विभाग कामाला लागला आहे.

१८ वर्षे पूर्ण झाली, नोंदणी केली का ?

वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदाराला ५ जानेवारी २०२४ रोजी मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी आगाऊ नाव नोंदणीची सुविधा निवडणूक आयोगाद्वारा दिली जात आहे. त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

आठ हजार मतदार यादीतून बाद.

मतदार यादीतून आतापर्यंत आठ हजारांवर मतदार बाद करण्यात आलेले आहेत. मतदार यादी अद्ययावत करून बिनचूक केली जात आहे. यासाठी बीएलओद्वारा दोन ते तीन महिन्यांपासून गृहभेटी दिल्या जात आहेत. घराघरात भेटीदरम्यान केंद्रस्तस्तरीय अधिकाऱ्यांद्वारा मतदारांची माहिती घेण्यात आली.

२१ हजार मतदारांची भर.

1) मतदार यादीमध्ये १८ ते १९ या नवमतदारांच्या गटात नाव नोंदणी करण्यात आल्याने सध्या जिल्ह्यातील आठ विधानसभा मत- दारसंघात २०८१९ मतदारांची भर पडली आहे.

2) मतदार यादीत नाव नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरु राहते. त्यामुळे नवमतदारांची संख्या ही प्रत्येक मतदारसंघात वाढती आहे.

मतदार वगळण्याची कारणे काय ?

मतदार यादीमध्ये दुबार, मृत, स्थलांतरित, बाहेरगावी स्थायिक झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात येत आहेत. यासाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारा दोन ते तीन महिन्यांपासून ही मोहीम राबविली जात आहे. याद्वारे मतदार यादीचे शुद्धिकरण केले जात आहे.

नोंदणी कशी कराल ?

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे नमुना ६ द्वारे अर्ज करावा लागतो. यासाठी काही कागदपत्रेदेखील जोडावी लागतात. याशिवाय अॅपवरुनही मतदार नोंदणी नागरिकांना करता येते. या सुविधेचा लाभ घेता येतो.

२५ व २६ नोव्हेंबरला प्रत्येक मतदार केंद्रावर विशेष शिबिर घेण्यात येऊन मोहीम राबविली जाणार आहे. याशिवाय मतदार नाव नोंदणी व जनजागृतीसाठी विविध उपक्रम, अभियान राबविले जात आहे.

– शिवाजी शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 2 =