थंडीचा परिणाम : पंखा, एसीचा वापर झाला कमी.
Winter Season Update : ऋतूप्रमाणे आता तापमानात : बदल होत असल्याने थंडी जाणवायला लागली आहे. त्याचमानाने विजेचा वापरही या महिन्यात कमी होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात येणारे वीज बिल हे कमी येणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांनी एसी आणि कुलरचा वापर बंद केला आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत दरवर्षी पावसाळ्यात विजेची मागणी कमी होते.
मात्र, यावर्षी उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही उकाडा जाणवत होता. त्यामुळे विजेची मागणी कमी झाली नव्हती. नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होताच विजेच्या मागणीत घट झाली आहे. मार्च महिन्यापासून गत महिन्यापर्यंत एसी व कुलरचा वापर वाढल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. विजेच्या दरात दरातही वाढ करण्यात आली होती आता जिल्ह्यातील तापमान घसरले आहे. यामुळे आता नागरिकांना येणारे वीजबिल कमी येणार आहे.
थंडीमुळे वीज वापर घटला.
सध्या थंडीचा मौसम सुरु झाला आहे. थंडीमुळे दिवसभर हवेत गारवा जाणवतो, त्यामुळे एसी, कुलर, पंखे बंद ठेवण्यात येत आहेत. विजेचा वापर कमी झाल्याने विजेचे बिलही ग्राहकांना कमी प्रमाणात होणार आहे.
दिवसा गरमी, रात्री थंडी.
किमान तापमानात मोठी घसरण झाली असली तरी कमाल तापमान मात्र कायम आहे. आता कुठे ऑक्टोबर हीट संपून हिवाळ्याला सुरुवात झाली. गुलाबी थंडीची चाहूल नोव्हेंबर सुरू होताच लागली आहे. रात्रीच्या सुमारास थंडी वाजते तर दिवसा काही प्रमाणात उकाडा जाणवतो. पुढील काही दिवसात थंडी वाढणार असल्याने विजेचा वापरही कमी होणार आहे. सध्या दिवसा काही प्रमाणात गरम तर रात्री बोचरी थंडीचे वातावरण तयार झाले आहे.
जिल्ह्यात वीज मागणी घटली.
उन्हाळ्यात वीज मागणीत सातत्याने वाढ होत असते, पंखा, एसी आणि कुलरचा वापर वाढतो. दिवसा आणि रात्रीही विजेचा वापर जास्त प्रमाणात होतो. पावसाळ्यातही विजेच्या मागणीत घट होते; परंतु, हिवाळ्यातही वीज घट जास्त होते. मागील काही दिवसांपासून उकाडा वाढला होता. परिणामी, जिल्ह्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, आता थंडी पडत असल्याने वीज मागणीत घट झाली आहे.
नोव्हेंबर महिन्याचे सुरुवातीलाच तापमानात घट झाल्याची जाणवते, त्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत विजेच्या मागणीत घट होणार आहे, पुढील महिन्यात येणाच्या वीजपुरवठा बिलावर त्याचा परिणाम होऊन देयक कमी येण्याची शक्यता आहे.
-प्रशांत गायकवाड, कार्यकारी अभियंता, आर्वी