Maregaon Congress Hunger Strike: कॉंग्रेसचे विजवितरणा विरोधात उपोषण सुरु.
इशाऱ्या नंतरही विजवितरण सुस्त.
Maregaon Congress Hunger Strike: मारेगांव तालुक्यातील होत असलेला अघोषीत लोडशेडिंग व शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी वेळेवर विज देण्यात यावी या मागणी साठी काँग्रेस कमेटी मारेगांवच्या वतीने मागील हत्यात विजवितरण कंपनीला निवेदन सादर केले होते मात्र दिलेल्या इशाऱ्याचा कालावधी संपल्याने मारेगांव येथे दि 23 ऑक्टोबर पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशकर खुराणा यांचे नेतृत्वात उपोषण सुरु करण्यात आले.
विजवितरण विभागाकडून सतत होत असलेल्या अघोषीत लोडशेडिंग व शेतकऱ्याच्या खरिप हंगामातील पिकांना सिंचनासाठी वेळेवर न मिळणार विज वेळेवर मिळावी म्हणून मारेगांव तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने दि १९ ऑक्टोबरला विजवितरण कार्यालय मारेगाव येथे निवेदन सादर केले, वेळेवर विज उपलब्ध करून घ्या अन्यथा पाच दिवसा नंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला होता.
तो शब्द खरा करित सोमवार पासून मारेगांव पोलीस पेट्रोल पंपासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली, या आमरण उपोषणाच्या माध्यमातून लोडशेडींग पूर्णता बंद करा, शेतकऱ्याना २४ तास विज उपलब्ध करून द्या, तालुक्यात १३२ के व्ही चे उपकेन्द्र तयार करा, ग्राहकाची संख्या नुसार नविन विद्युत केंद्रांची मान्यता घ्या, वनोजादेवी , कुंभा, वेगाव, रोहपर येथे ३३ के व्हीचे उपकेन्द्र तयार करा.
होणारी पठानी वसूली त्वरीत थांबविण्यात यावी, कृषी पंपाचे कनेक्शन त्वरीत जोडण्यात यावे अन्यथा काँग्रेस कमेटीच्या वतीने या पेक्षा तीव्र आंदोलन करून विजवितरण ला धडा शिकविला जाईल अशा मागण्या करण्यात आल्या, आमरण उपोषणाला काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक आकाश बदकी, अंकुश माफुर उपोषणाला बसले असून , यावेळी उपस्थित पणन महासंघाचे संचालक नरेन्द्र पाटील ठाकरे, यादवराव पांडे, यादवराव काळे, समिर सय्यद सह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.