यवतमाळ येथे शिक्षकांनी नवसाक्षर प्रशिक्षणावर टाकला बहिष्कार.

यवतमाळ येथे शिक्षकांनी नवसाक्षर प्रशिक्षणावर टाकला बहिष्कार.

शिक्षकांत अशैक्षणिक कामाबाबत असंतोष,प्रशिक्षणस्थळी शिक्षकांनी प्रशासनाला दिले निवेदन.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने जिल्हा प्रशिक्षण संस्था यवतमाळ द्वारा आयोजित यवतमाळ तालुका स्तरीय नवभारत साक्षरता प्रशिक्षण दि. १८.१०.२०२३ ते २०.१०.२०२३ पर्यंत शिवाजी हायस्कुल यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण नियोजन स्थळी प्रशिक्षण नियंत्रक विस्तार अधिकारी दिपीका गुल्हान े, केंद्रप्रमुख सुदर्शन थोटे तर सुलभक म्हणून वैशाली गायकवाड,अमित गावंडे, शाम माळवे, दिपलक्ष्मी ठाकरे यांची उपस्थिती होती. यावेळी नगर परिषद व जिल्हा परिषद.

अंतर्गत शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती होती. परंतु ऐनवेळेवर प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे हे प्रशिक्षण होवू शकले नाही.यावेळी प्रशिक्षणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी अशैक्षणिक कामावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला. विविध ऑनलाईन कामे, विविध शिष्यवृत्त्या, विविध प्रशिक्षण या अशैक्षणिक कामामुळे शिक्षक बेजार असतांना नवभारत साक्षरता अभियान यशस्वी होण्यासाठी शासनाकडून प्रशिक्षणाचा व शिक्षकांना अशैक्षणिक कामे लागण्याचा मनसुबा शासनाचा असल्याने यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी प्रशिक्षण नियंत्रक विस्तार अधिकारी दिपीका गुल्हाने यांच्या मार्फत गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यवतमाळ यांना निवेदन सादर करून अशैक्षणिक कामाबद्दल रोष व्यक्त केला.

त्यामुळे ऐनवेळी हे प्रशिक्षण होवू शकले नाही. यावेळी प्रशासनाकडे निवेदन देतांना नगर परिषद व जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक पुंडलिक रेकलवार, विनोद डाखोरे, मिलींद देशपांडे, संजय वनकर, दिपक चौधरी,विजय ढाले, देवेंद्र लुटे, अशोक उपरे, विणा काळे, अशोक राऊत, स्वाती पवार , अस्मीता लांबट, अर्चना वासेकर, जयश्री मदने, प्रविण जाधव, नरेश महात्मे, , वैजयंती मैंदळकर, शितल मनवर, अरूणा पाठक, असरार खान, रवि चौधरी, डी.एन. घुगे, सैयद अजहर अली, उमेश डेहनकर आदि नगर परिषद अंतर्गत व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांची उपस्थिती होती तसेच विविध शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 3 =