26 रोजी नरसी येथे संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन!
नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर
तालुक्यातील नरसी येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान जागृती समितीच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाबद्दल जन माणसात जागृती व्हावी यासाठी संविधान जागृती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक २४ नोव्हें. रोजी शासकीय विश्रामगृह नरसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार जनमानसात भारतीय संविधान व त्यातील आपले हक्क आणि कर्तव्य याबद्दल जागृती व्हावी यासाठी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता नरसी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर तिरंगा झेंडा हाती घेऊन वारकरी वेशभूषेत संविधानाच्या प्रतीची व संविधानाला अभिप्रेत घोषणा देत दिंडीला अर्थात रॅलीला न्यायाधीश श्रीमती ए. टी. गीते यांच्या उपस्थितीत सुरुवात होईल. सदर दिंडी ची सांगता शिवकृपा मंगल कार्यालय येथे होईल.
तेथे प्रभारी तहसीलदार आर. जी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संविधानावर प्रबोधनात्मक ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, यांचे व्याख्यान होईल. नायगाव तहसीलदार मंजुषा भगत, गट विकास अधिकारी लक्ष्मण वाजे, प्राचार्य एस.जी. मांदळे,पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, सपोनी संकेत दिघे, आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अहवान समितीचे शेख मोहिदिन अफजलसाब ,प्रा.प्रमोद फकीरे, प्रा.सिद्धार्थ सोनकांबळे,साईनाथ कांबळे,भास्कर भेदेकर, सचिन भेदे,देविदास सूर्यवंशी, राहुल डूमणे, किरण इंगळे, संदीप उमरे यांच्यासह आयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत अहवान करण्यात आले आहे.