आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने नायगाव तालुक्यातील नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर.
नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थाचे उद्घाटन व जिल्हास्तरीय कार्यकारणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली असून. त्याचबरोबर नायगाव तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यात तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असून नायगाव तालुक्यातील विविध गावातून अनेक पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे.
आम्ही वारकरी परिवार हे गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये व राज्यामध्ये कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसाठी व जनकल्याणासाठी काम करत असून गेल्या पाच ते सहा वर्षापासून संस्थेमध्ये एकूण सदस्य अंदाजीत सात हजाराच्या जवळपास झाले असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राम महाराज पांगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सबंध विविध जाती धर्माचे लोक एकत्र येत जीवनाच्या कल्याणासाठी व जीवनाचा उद्धारासाठी ज्ञानभक्तीचे धडे घेत.
आणि जीवनामध्ये धार्मिक व सामाजिक कार्य घडविण्यासाठी आणि धार्मिक कार्य पुढे नेण्याकरिता सबंध मानव जात एकत्र येत आम्ही वारकरी सेवाभावी संस्था च्या माध्यमातून नायगाव तालुक्यासह जिल्ह्यातील एकूण सोळा तालुक्यामध्ये देखील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यक्रमादरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ह भ प राम महाराज पांगरेकर,ह. भ. प.गंगाधर महाराज हंबर्डे, व्यंकट महाराज जाधव, प्रभाकर महाराज, माऊली महाराज काकांडी कर, यासह जिल्ह्यातील नामवंत व विध्दवान महाराज यांच्या शुभहस्ते नायगाव तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना पदभार देण्यात आले.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.
१) सोपान विठ्ठल गिरे – बरबडा ता नायगाव – अध्यक्ष
२) शंकर खंडोजी आखले – देगाव ता नायगाव – उपाध्यक्ष
३) बालासाहेब गोविंदराव येरवडे – ता नायगाव – सचिव ४) राजाराम भुजंगराव गादेवार – ता नायगाव – कोषाध्यक्ष
५) परशुराम केरबा कोलगाणे – बरबडा
ता नायगाव – सहसचिव
६) लक्ष्मण विठ्ठलराव चन्नावार – ता नायगाव – सदस्य
७) शिवाजी पा कदम – वंजरवाडी ता नायगाव – सदस्य
९) साईनाथ लांडगे मांडणी – ता नायगांव – सदस्य
१०) माधव दत्ताहरी डोईफोडे – इज्जतगाव ता.नायगाव – सदस्य
११) प्रकाश बळीराम वाघमारे – हुसा ता नायगाव – सदस्य
१२) मोहन मारोती माऊले – चारवाडी ता नायगाव – सदस्य
१३) ज्ञानेश्वर गोविंद शिंदे – ता नायगाव – सदस्य
१४) कोंडीबा दौलतराव – बेंबरे ता नायगाव – सदस्य
१५) सूर्यकांत शंकरराव पांडे – रुई ता नायगाव – सदस्य
१६) विठ्ठल दिगंबर माने – ता नायगाव – सदस्य
१७) गोपाळ निवृत्ती बेलकर – बळेगाव ता नायगाव – सदस्य
१८) अशोक नरसिंग पांचाळ – ताकबीड ता नायगाव — सदस्य
१९) सूर्यकांत भाऊराव वाघमारे – हुस्सा ता नायगाव –
२०) किशोर कामाजी वाघमारे – हूस्सा ता नायगाव –
२१) शंकर खंडोजी वाघमारे – हूस्सा ता नायगाव
ईत्यादीची निवड करुन प्रशस्ती पत्र देण्यात आले आहे. याप्रसंगी नायगाव तालुक्यासह जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात भक्त उपस्थित असून यात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला आहे.